पुणे : उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरने केला बलात्कार

याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे; आरोपीस अटक

man arrested
( संग्रहित छायचित्र )

मणक्याच्या आजारावर उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर डॉक्टराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी डॉ़. योगेश लक्ष्मण वाल्हे (वय ४५, रा. अमोल एनक्लेव्ह कोटकर लेन, भाऊ पाटील रोड, औंध) याला अटक केली आहे.

याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० दरम्यान श्री अ‍ॅक्युपंक्चर पौड रस्ता आणि फिर्यादीच्या घरी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी डॉ़. वाल्हे याच्या रुग्णालयात गेली होती . यावेळी गैरफायदा घेऊन डॉक्टरने तिच्याशी जवळीक साधली. मणक्याच्या आजारावर उपचार करण्याच्या बहाण्याने बलात्कार केला. तिचे फोटो मोबाईलमध्ये काढले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले सहायक पोलीस निरीक्षक खेतमाळीस तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune a young woman who came for treatment was raped by a doctor pune print news msr

Next Story
राज्यसेवा परीक्षा पद्धत, अभ्यासक्रमातील बदलांची २०२३ पासूनच अंमलबजावणी
फोटो गॅलरी