मार्केट यार्डातील घाऊक बाजारात बेकायदा किरकोळ लिंबे तसेच फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात बाजार समितीकडून आज (रविवार) कारवाई करण्यात आली. बाजार आवारात किरकोळ विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी होत होती.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या काही वर्षंपासून लिंबू आणि फळांची किरकोळ विक्री करण्यात येत आहे. किरकोळ विक्रेत्यामुळे बाजारातील वाहतुकीस अडथळा होत असल्याने १०० किरकोळ विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली, असे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बाजार समितीचे सचिव राम घाडगे, अतिरिक्त सचिव नितीन रासकर, फळे भाजीपाला विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, कांदा बटाटा विभाग प्रमुख दत्ता कळमकर, अडते संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध भोसले, सचिव करण जाधव, माजी अध्यक्ष विलास भुजबळ, अमोल घुले, कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून बाजार आवारात लिंबांची किरकोळ विक्री करण्यात येत होती. घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. शेतकरी आणि ग्राहकांच्या वाहनांना अडथळा होत होता.

तीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजारात जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. अडते संघटनेसह बाजार घटकांनी बाजार आवारातील किरकोळ विक्रेत्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती, असे गरड यांनी सांगितले.