पिंपरी- चिंचवड: हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रफुल्ल लोढाला पिंपरी- चिंचवडच्या बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय पीडित महिलेने प्रफुल लोढाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील तपासाठी बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतलं आहे. प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावं म्हणून कोर्टाला हस्तांतरित वॉरंट मागण्यात आलं होतं. आज सकाळी ऑर्थर रोड कारागृहातुन ताब्यात घेतलं आहे.

अखेर प्रफुल्ल लोढाला पिंपरी- चिंचवड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. २७ मे २०२५ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील नामांकित हॉटेलमध्ये महिलेला बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. प्रफुल्ल लोढाने पीडित महिलेच्या पतीला नोकरी लावतो असे आमिष दाखवून हॉटेलवर बोलवून घेऊन अत्याचार केला आहे. याआधी मुंबईमधील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रफुल्ल लोढाच्या चौकशीत नेमकं पुढे काय येत पाहावं लागेल. तसेच लोढाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.