पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमच्या दोघींमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे दिसत नव्हती असे मुक्ता टिळक यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या सेल्फ आयसोलेशनमध्ये असून घरीच होम क्वारंटाइनमध्ये आहेत. कुटुंबीयातील अन्य सदस्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची त्यांनी माहिती दिली. मुक्ता टिळक पुण्याच्या माजी महापौर आहेत. मागच्यावर्षी त्या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

मुंबई, पुणे या दोन शहरात करोनाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. इथे करोना रुगणांची संख्या सातत्याने वाढत आहे. एकूणच संपूर्ण देशात करोना रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना करोनापासून सर्वाधिक धोका आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bjp mla mukta tilak corona positive dmp
First published on: 07-07-2020 at 18:20 IST