बाहुलीला कैद्यासारखी फाशी देऊन एका आठ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येपूर्वी आठ वर्षीय मुलगा बाहुलीसोबत खेळत होता. मुलाच्या मृतदेहाशेजारी फाशी दिलेली बाहुली आढळली आहे. या घटनेमुळं पोलिसांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात राहत्या घरात आठ वर्षीय मुलगा बाहुलीसोबत खेळत होता. त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा टाकून तिला फाशी दिली. त्यानंतर बाहुलीचा मृत्यू झाल्याचा समज करून आठ वर्षीय आपल्या तोडांवर कपडा टाकून मुलाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आई कामात व्यस्त असताना ही धक्कादायक घटना घडली. मोबाईलवरील हॉरर व्हिडिओ पाहून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या गंभीर घटनेमुळं पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अधोरेखित झालं आहे. तसेच, मुलं तासंतास मोबाईल बघत असताना ते कुठले व्हिडिओ, कार्टून, गेम पाहतात हे देखील पाहणे तितकंच महत्वाचं आहे. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.