पुणे : मध्यभागातील एका नामांकित शाळेत नववीतील मुलाला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची चित्रफीत प्रसारित झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुलाच्या आईने तक्रार दिली आहे. शहराच्या मध्यभागातील एका नामांकित शाळेत ७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा मुलगा नववीत शिकत आहे. दुपारी काही मुले वर्गात गोंधळ घालत होती. त्यावेळी शिक्षिका वर्गात आल्या. मुले बाकावर जाऊन बसली. तक्रारदार महिलेचा मुलगा बाकावर नसल्याचे आढळून आले नाही. त्यानंतर शिक्षिकेने मुलाला फळ्याजवळ नेऊन बेदम मारहाण केली.

हेही वाचा – पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित

हेही वाचा – घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण

वर्गातील एका मुलाने मोबाइलद्वारे चित्रीकरण केले. चित्रफीत प्रसारित झाल्याचे समजताच मुलाच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे, अशी माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.