पुण्यात अतिरिक्त आयुक्त असलेल्या राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांसमोरच बेदम मारहाण करण्यात आली. नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात हे कृत्य करण्यात आले. जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना ही घटना घडली. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. महापालिकेमध्ये दुपारच्या सुमारास अशाप्रकारची घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलपर्णी गैरव्यवहारात भाजपाचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापौर दालनात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान ‘दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकानी महापौरकडे केली. ज्यांनी निविदा काढल्या त्यांच्याकडून खुलासा नको, अधिकारी चोर आहेत अशा घोषणाही कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर त्याठिकाणी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune corporation additional commissioner rajendra nimbalkar has bitten by corporators supporter at mayors cabin
First published on: 11-02-2019 at 17:41 IST