सुरक्षारक्षक म्हणून काम करत घरफोडी करणाऱ्या सहा जणांच्या नेपाळी टोळीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांकडून तब्बल ६५ तोळे सोने व ७ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या चोरट्यांनी ५ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे.
ही सहा जणांची नेपाळी टोळी बाणेर व बालेवाडी परिसरात सुरक्षारक्षकाचे काम करत. याचदरम्यान ते रो हाऊस आणि फ्लॅटची पाहणी करून तिथे चोरी करत. चतुश्रृंगी पोलिसांनी या सहा जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून ६५ तोळे सोने व ७ किलो चांदी जप्त केली आहे. या सर्व चोऱ्या बाणेर आणि बालेवाडी परिसरात झाल्या आहेत. प्राथमिक चौकशीत या चोरट्यांनी पाच ठिकाणी केलेल्या घरफोडीची माहिती दिली आहे. तपासात आणखी महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या चोरट्यांनी आणखी किती घरे फोडली होती, यांच्या टोळीत स्थानिकांचा समावेश आहे काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime 6 nepali people arrested for burglary in pune by chaturshrungi police
First published on: 22-02-2017 at 10:53 IST