मारहाण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पिस्तूल विकत घ्यायला पैसे हवेत म्हणून एका तरुणाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सांगवीमध्ये (पुणे) घडलीय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.
सांगवीमधील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. विशाल दत्तू कांबळे असे आरोपीचे नाव आहे, तो मूळचा कर्नाटकचा असून काही दिवसांपूर्वी त्याला काही तरुणांनी मारहाण केली होती. त्यांचा बदला घेण्यासाठी विशालला पिस्तूल आणायचं होतं. पण, पैसे नसल्याने त्याने एटीएम फोडण्याचा प्लॅन केला.
विशालचा हा प्लॅन फसला आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
