पुणे : खडकी परिसरात ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. दिनेश अमृतलाल जैन (वय २४, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्येष्ठ महिला २८ मे रोजी खडकीतील एलफिस्टन रस्त्यावरून निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी जैनने त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले होते.

ज्येष्ठ महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी एलफिस्टन रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तांत्रिक तपास, तसेच खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैनला पकडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस कर्मचारी सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, संदेश निकाळजे, ऋषिकेश दिघे, प्रताप केदारी आणि पथकाने ही कामगिरी केली. जैन याने दागिने हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का ? यादृष्टीने पोलिसांकडे तपास करण्यात येत आहे.