पिंपरी-चिंचवडमध्ये मित्राने पिस्तूल आणलं म्हणून पोलिसांना सांगतो असं म्हणताच त्याची गोळी झाडून खून केल्याची घटना घडली आहे. यात, १५ वर्षीय ओवेज इसाक इनामदार या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. २४ वर्षीय किरण वसारे असे आरोपी मित्राचे नाव आहे. किरणला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवेज आणि किरण दोघे ही मित्र होते. किरणकडे विनापरवाना पिस्तूल होते. ते मयत ओवेजला माहीत होते. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किरणने ओवेजच्या मोबाईल शॉपीमध्ये पिस्तूल आणलं होतं. यामुळे ओवेज संतापला होता. इथं पिस्तूल कशाला आणलंस?, मी पोलिसांना सांगतो असं किरण आरोपीला म्हणाला. यावरून किरणने कोणताही विचार न करताच ओवेजवर त्याच पिस्तूलातून गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या ओवेजचा मृत्यू झाला.

आणखी वाचा- पुणे : लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने केली हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अगोदर हा प्रकार चुकून गोळी सुटल्याचा वाटत असतानाच तपासामध्ये हा खून असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी किरणला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून संबंधित घटनाक्रम त्याने पोलिसांना सांगितला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी ओवेजला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं आहे.