दारु पिताना दोन मित्रांमध्ये वाद झाल्याने दुर्दैवी घटना घडली. दोन मित्रांमध्ये भांडण झाले. यावेळी त्यातील एका मित्राने दुसर्‍यावर लाकडाने हल्ला केला. त्यात डोक्यात गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील गरवारे महाविद्यालयात घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. ‘साहेब मी मित्राचा खून केला आहे. मला अटक करा,’ असं म्हणत आरोपींने गुन्ह्याची कबुली दिली.

राजेश रमेश सहानी (वय २७, रा. वारजे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर किसन प्रकाश वरपा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजन आणि किसन या दोघांना दारूचे व्यसन होते. नेहमी प्रमाणे दोघे रविवारी दारू पिण्यासाठी एका ठिकाणी बसले होते. तेथून दोघे जण सिंहगडावर गेले. तिथे जाऊन दोघांनी पुन्हा दारू पिली. त्यानंतर तिथून ते दोघे गरवारे महाविद्यालयाच्या जवळ आले. महाविद्यालयाच्या कंपाऊंडवरून आतमध्ये गेले. त्यावेळी महाविद्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर जाऊन त्यांनी सोबत आणलेली दारू पिण्यास सुरूवात केली. त्याचवेळी दोघांमध्ये भांडण झाले.

पुणे : चारित्र्यावरील संशयाने संसार उद्ध्वस्त; पत्नीचा गळा दाबून खून, स्वतः घेतला गळफास

किसन याने राजेश याला फावड्याच्या दांड्याने डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे तो तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. काही वेळानं किसनने एका वर्गात राजेशचा मृतदेह ठेवून दिला. त्यानंतर किसन घरी निघून आला. रात्रभर राजेश घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली.

पिंपरी-चिंचवड : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून केला खून!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचा शोध घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं असताना, दुसर्‍या दिवशी मध्यरात्री किसनने पुन्हा महाविद्यालयात ज्या ठिकाणी राजेशला मारले, त्या ठिकाणी जाऊन पाहिले. राजेशचा मृतदेह पाहिल्यानंतर किसन डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला. ‘साहेब मी मित्राचा खून केला आहे. मला अटक करा’, असं तो पोलिसांना म्हणाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी तिथे राजेशचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू असल्याचे डेक्कन पोलिसांनी सांगितले.