शहर परिसरातून दुचाकी तसेच रिक्षा चोरणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला तरुण संगीत विशारद असून त्याने झटपट पैसे कमाविण्यासाठी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : आधी रिक्त पदे, शिष्यवृत्तींचे प्रलंबित प्रश्न सोडवा ; उच्च शिक्षण क्षेत्रातून नाराजीचा सूर

गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज (वय २२, रा. काळेपडळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाळुंज संगीत विशारद आहे. हडपसर भागात दुचाकीस्वार तरुण थांबला असून त्याच्याकडे असलेल्या दुचाकीला वाहन क्रमांकाची पाटी नसल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे असलेले दुचाकी चोरीची असल्याची माहिती मिळाली. तपासात त्याच्याकडून तीन दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : जिल्ह्यातील १०६१ ग्रामपंचायतींना आंतरमहाजाल सेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने बंडगार्डन, दिघी, चाकण परिसरातून वाहने लांबविल्याचे तपासात उघडकीस आले. त्याला बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, दिनकर लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, सुदेश सपकाळ, राहुल इंगळे आदींनी ही कारवाई केली.