पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील पाण्याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान केले. ‘पाणी सोडा म्हणून माझ्यावर दबाव असतो. पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही. त्यासाठी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो,’ असे पाटील यांनी सांगितले. 

भारती विद्यापीठाचा स्थापना दिन आणि जीवनसाधना गौरव पुरस्कार कार्यक्रमात पाटील बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा, इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड शहराचे विद्रुपीकरण करणारे जाहिरात फलक काढा, श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाटील म्हणाले, की पतंगराव कदम यांचे सर्व राजकीय नेत्यांशी पक्षाच्या पलीकडे संबंध होते;पण आज राजकारणात दुसऱ्या पक्षाची व्यक्ती शत्रू मानण्यासारखी परिस्थिती आहे. पक्षापलीकडे संबंध दुर्मीळ झाले आहेत. शिव्यांचं भांडार राजकारणात वापरले जाते. आजच्या काळात नवसंशोधनाला पर्याय नाही. नवे शैक्षणिक धोरण व्यवसायाभिमुख आहे. रोजच्या जीवनात उपयुक्त ठरणारे शिक्षण हा या धोरणाचा गाभा आहे.