पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एमएसआरटीसी), पुणे महानगर परिवहन मंडळाकडून (पीएमपी), पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद यांसह जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण विभाग, महसूल विभाग, महावितरण, कृषी, सहकार, पणन मंडळ आणि इतर केंद्र आणि राज्य सरकारी, निमसरकारी विभागांची वाहने उपलब्ध करून देण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली असून त्यांची तब्बल अडीच हजार वाहने ताब्यात घेतली आहेत.

निवडणूक अधिकारी, निरीक्षक, मनुष्यबळ आणि मतदान यंत्रांची ने-आण आदी कारणांसाठी जिल्हा प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील विविध शासकीय विभागांची २६८१ वाहने ताब्यात घेतली आहेत. काही वाहने कंत्राटी पद्धतीने घेण्यात आली आहेत.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

हेही वाचा >>>अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार

जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदार संघात मिळून एकूण ८३८२ मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे, मनुष्यबळ यांची ने-आण, निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेले अधिकारी, भरारी पथके याकरिता तब्बल ३११८ वाहने लागणार आहेत. त्यासाठी नोटीस बजावून ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत ४० हजार २९३ मतदान यंत्रे लागणार आहेत. ही मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममधून प्रत्येक मतदान केंद्र चालकांच्या ताब्यात पोहचविणे, मतदान झाल्यानंतर सर्व यंत्रे पुन्हा स्ट्रॉंग रूममध्ये नेणे, याकरिता कंटनेर लागणार आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदरपासून पोलिंग बुथवरील अधिकारी, कर्मचारी आणि बाहेरील राज्यातून येणारे मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षक, भरारी पथके आदींना वाहतुकीसाठी या वाहनांची आवश्यकता असते.

अशी वाहने लागणार

एमएसआरटीसी : ५९९ एसटी बस

पीएमपी : ९३१ बस

कंटेनर : ७२

भरारी पथकांसाठी : २२४ चारचाकी

निवडणूक निरीक्षकांसाठी : १२ चारचाकी

मतदारसंघ केंद्रनिहाय अधिकारी : ८५५ चारचाकी, जीप

निवडणूक निर्णय आणि सहायक अधिकारी : ६० चारचाकी