पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने (कात्रज) गायीच्या दूध विक्री दरात दोन रुपयांनी कपात केली आहे. आज. एक डिसेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. या निर्णयाचा पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील ग्राहकांना फायदा होणार आहे. संचालक मंडळाची सभा संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या सभेमध्ये गायीच्या दुधापासून तयार होणाऱ्या कात्रज टोण्ड मिल्क दरामध्ये प्रति लीटर दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एक डिसेंबरपासून ग्राहकांना कात्रज एक लीटर पॅकिंगचे टोण्ड दूध आता ५३ रुपये प्रति लीटरमध्ये उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अजब कारभार, अर्थशास्त्राला दुय्यम स्थान

हेही वाचा… पुणे काँग्रेसमध्ये सारे काही शांत शांत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी स्निग्ध व जास्त प्रोटिन असलेले डबल टोण्ड २५० मिली दूध ग्राहकांना १२ रुपये दराने उपलब्ध करून दिले जात आहे. गायीच्या दुधाचा खरेदी दर २६ रुपयांपर्यंत खाली आहे. कमी दराने दूध उपलब्ध होत आहे. ग्राहकांनाही त्याचा लाभ देण्यासाठी संघाने दूध विक्री दरात दोन रुपयांनी कपात केली आहे. या निर्णयाचा पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील ग्राहकांना फायदा होईल, अशी माहिती ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के यांनी दिली.