पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ दोन सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील नेतेमंडळी अधिक आक्रमक होऊन, महायुती सरकारच्या कारभारावर टीका करण्यास सुरुवात झाली. त्याच दरम्यान पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. त्यानंतर पुणे पोलिस, महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पाहण्यास मिळत असून आज सकाळपासून फर्ग्युसन रोडवरील अनाधिकृत हॉटेल, पब विरोधात बुलडोझरच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा : फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री ’ बारचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ दोन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, राज्यातील विरोधी पक्षातील नेते मंडळी आक्रमक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने, सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी एल ३ लिक्विड लिजर लाऊज हे पब सील करीत या प्रकरणी रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, मानस मलिक, अक्षय कामठे यासह अन्य तिघांना असे एकूण आठ जणांना अटक केली आहे.तर या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने २९ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.