पुणे : पुणे शहरातील भावे हायस्कूल समोरील रस्त्यावर मद्यधुंद चार चाकी गाडीच्या चालकाने १२ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. तर या घटनेमधील ६ विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहेत.

जखमी विद्यार्थीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोनवरून संवाद साधत म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, माझे डॉक्टरांसोबत बोलण झाले असून तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी या घटनेतील सर्व जखमींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मदत दिली जाणार असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने म्हणाले, भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी काही विद्यार्थी असून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्याची एक परीक्षा उद्या होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च हा सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.