पुण्यातील लोहगाव परिसरातील एका सोसायटीत बंगला विक्रीच्या आमिषाने पाच जणांची ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश अर्जुनराव जगदाळे (वय ४१, रा. आयव्ही इस्टेट, वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत स्वरुप रमेश जोशी (वय ३४, रा. बाणेर) यांनी फिर्याद विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नुसार, महेश अर्जुनराव जगदाळे (वय ४१, रा. आय व्ही ईस्टेट, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जगदाळे याने जोशी यांनी लोहगावमधील सफायर व्हिला सोसायटीत रो हाऊस स्वस्तात विकायचे आहे, असे आमिष दाखविले होते. त्याने जोशी यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. होती. त्यानंतर त्याने जोशी यांना बंगला मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जोशी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

जगदाळे आणखी चार जणांकडून बंगला विक्रीच्या आमिषाने ३२ लाख रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील निरगुडकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune five persons were cheated of 52 lakhs by the lure of selling a bungalow at a cheap price pune print news msr
First published on: 09-08-2022 at 11:44 IST