पुणे : येरवडा भागात बीएमडब्लू गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली. त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर त्या तरुणाने अश्लील हावभाव करून तेथून भरधाव कारने निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला भाग्येश निबजीया ओसवाल शेजारी बसलेला होता.या दोघांविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर या प्रकरणावरुण संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याच दरम्यान या प्रकरणातील आरोपी भाग्येश निबजीया ओसवाल याला पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा हा फरार आहे. त्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना करण्यात आली आहे.
तर त्याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजाचा व्हिडिओ लोकसत्ता डॉट कॉमच्या हाती आला आहे. त्यामध्ये मुख्य आरोपी गौरव आहुजा हा हात जोडून म्हणतोय, नमस्कार मी गौरव आहुजा राहणार पुणे, माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य घडले, ते कृत्य खूप चुकीचे होते. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो, संपूर्ण जनता, पोलीस विभाग आणि शिंदे साहेब, या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.
येरवडा भागात बीएमडब्लू गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली. त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर तो तरुण अश्लील हावभाव करून तेथून भरधाव कारने निघून गेला. याप्रकरणी आता आरोपी गौरव अहुजाने व्हिडिओ शेअर करत पोलीसांना शरण जाणार असल्याचे म्हटले आहे. pic.twitter.com/dEk2HqHw2K
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) March 8, 2025
पुढे तो म्हणाला, मला माफ करा आणि मला एक संधी द्या, तसेच मी पुढच्या आठ तासांत येरवडा पोलिसांसमोर हजर होणार आहे. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना त्रास देऊ नका, अशी विनंती करताना आरोपी दिसत आहे. आता त्यावर येरवडा पोलीस कशा प्रकारे पुढील कार्यवाही करतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.