पुणे : ‘भाजपचा पदाधिकारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याला त्रास देत असल्याच्या तक्रारीची दखल का घेतली नाही,’ याचा खुलासा करण्याबाबतची नोटीस आरोग्य प्रमुखांनी दोन अधिकाऱ्यांना बजावली आहे.

भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याने जानेवारी २०२५ मध्ये महापालिका आयुक्तांसह आरोग्य प्रमुखांकडे केली होती. तसेच, महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात न आल्याने संबंधित पदाधिकाऱ्याकडून त्रास देणे सुरूच राहिले.

त्यामुळे महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. महापालिका आयुक्तांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन भाजपच्या पदाधिकाऱ्याला महापालिकेत येण्यास बंदी घातली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्तांच्या कारवाईनंतर महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्यासह अंतर्गत महिला चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना बळीवंत यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल वेळीच का घेतली नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे.