पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रवासी पिशव्यांची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक तपासणी यंत्र (स्कॅनर मशिन) आणण्यात आले असून, रेल्वे पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर दिवभरात २०० पेक्षा अधिक गाड्यांची वर्दळ असते. रेल्वे स्थानक २४ तास सुरू असते. स्थानकावर दीड लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. रेल्वे प्रवास करताना ज्वलनशील वस्तू, स्फोटक साहित्य किंवा शस्त्रांची वाहतूक करण्यास मनाई आहे. मात्र, याची पडताळणी करण्यासाठी एकच तपासणी यंत्र होते. ते यंत्रदेखील मधल्या काळात बंद पडले होते. सुरक्षिततेच्या अनुषंगाने जुने तपासणी यंत्र दुरुस्त करून नव्याने दोन तपासणी यंत्रे बसविण्यात आली आहेत.

असे आहे सुरक्षा नियोजन

रेल्वे स्थानकावर प्रवासी पिशव्यांची तपासणी करण्यासाठी पूर्वीचे एक आणि नव्याने दोन अशी तीन यंत्रे बसविण्यात आली आहेत. तसेच, रेल्वे सुरक्षा दलाचे १६ कमर्चारी, एक वरिष्ठ अधिकारी आणि सहायक अधिकारी असे १८ जणांचे पथक बंदोबस्तासाठी असणार आहे. प्रवाशांकडील अवजड सामान आणि पिशव्यांची यंत्राद्वारे तपासणी केल्यानंतरच फलाटामध्ये प्रवेश दिला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने प्रवाशांच्या पिशव्या तपासण्यासाठी अत्याधुनिक दोन तपासणी यंत्रे प्रवेशद्वाराजवळ बसविली आहेत. तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना फलाटावर प्रवेश दिला जाईल. – डॉ. मिलिंद हिरवे, वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे विभाग, पुणे</p>