Pune Dahi Handi 2025 Celebration / पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी 7 थर लावून रात्री 9 वाजून 30 मिनीटांनी चौथ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या गोविंदाने हंडी फोडली.
बेलबाग चौकाजवळ असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या पारंपरिक जागेत जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, तुषार रायकर, प्रतिक घोडके यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव पाहण्याकरिता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. यंदाच्या वर्षी भव्य 40 फूट उंचीच्या एलईडी स्क्रिनवरुन श्रीकृष्ण लीला दर्शन गोपाळभक्तांना झाले. कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला रुपये 51 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.