कात्रज घाटात दरड कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. डोंगर कपारीतून निखळेलेला मोठा दगड घाट रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मात्र दगड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

कात्रज बोगद्यापासून काही अंतरावर दरड कोसळल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. त्यावेळी अग्निशमन दलातील जवान सागर इंगळे पीएमपी बसने जात होते. बसच्या पुढे दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. घाट रस्त्यात दगड पडल्याने वाहतूक काही विस्कळीत झाली होती. इंगळे यांनी या घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दिली. दगड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.