लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लोकल ट्रेननं एका म्हशीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे तब्बल एक तास रेल्वेसेवा विस्कळीत झाली. संबंधित मृत म्हैस रेल्वेखाली अडकून बसल्याने रेल्वेला पुढे मार्गक्रमण करता आलं नाही. परिणामी पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

अपघातात मृत पावलेल्या म्हशीला रेल्वेखालून बाहेर काढल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. या अपघातामुळे लोणावळा- पुणे लोकलसह इतर रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. हा अपघात तळेगाव-देहूरोडच्या दरम्यान घडला. लोणावळा-पुणे लोकल पुण्याच्या दिशेने जात असताना लोहमार्गावर आलेल्या म्हशीला लोकलने धडक दिली. या अपघातानंतर संबंधित म्हैस लोकलखाली अडकली. त्यामुळे लोकलला पुढे जाण्यास अडथळा येत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेखाली अडकलेली म्हैस हटवण्यासाठी तब्बल एक तास लागला. त्यांनतर लोकल पुण्याच्या दिशेने रवाना झाली. यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या अपघातामुळे दोन्ही दिशेनं धावणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवण्यात आल्या होत्या, असं सांगण्यात येत आहे.