पद राष्ट्रवादीचे आणि निष्ठा भाजप आमदारांशी अशा कोत्रीत सापडल्याने वारंवार डिवचण्यात येणाऱ्या पिंपरीच्या महापौर याच मुद्दय़ावरून शुक्रवारी पक्षकोर्यालयातच रडकुंडीला आल्या.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीत होते, तेव्हा त्यांच्या शिफोरशीवरून धराडे यांना अजित पवारांनी महापौरपद दिले होते. नंतर, जगताप भाजपमध्ये गेले आणि धराडे राष्ट्रवादीतच राहिल्या. मात्र, तरीही त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी कोयम शंको घेतली जाते आणि यावरू न त्यांना डिवचण्यातही येते. हाच अनुभव त्यांना शुक्र वारी आला. पक्षकोर्यालयातील कोर्यक्र मात एको माजी उपमहापौराने भाषणात, या दुहेरी निष्ठेचा सूचक संदर्भ देत आमचा पक्ष-तुमचा पक्ष असा शब्दप्रयोग महापौरांना उद्देशून केला. हे ऐकून महापौर भावनिक झाल्या.
आपल्या भाषणात त्यांनी हा मुद्दा खोडून कोढला. लक्ष्मण जगताप हे आपले राजकीय गुरू आहेत. मात्र, पवारांनी महापौरपद दिले, याची जाणीवही आहे. आपण कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तेव्हा त्या रडण्याच्या बेतात होत्या. त्यानंतर पदाधिकोऱ्यांनी सारवासारव करून महापौरांची समजूत कोढली.
आमचा पक्ष-तुमचा पक्ष, असे शब्द वापरले गेले, ते मला बिलकूल आवडले नाही. मी राष्ट्रवादीतच आहे. राष्ट्रवादीने भरभरून दिले आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा विचार करण्याचा प्रश्नच नाही. ज्यांनी हे शब्द वापरले, त्यांनी नंतर माफी मागितली. माफीची गरज नाही.
मात्र, पुन्हा असे म्हणू नको, असे सांगून आपण हा विषय संपवला. – शकुंतला धराडे, महापौर