scorecardresearch

आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील? खासदार बापट- संजय काकडे यांच्याकडून एकत्रित धुळवड साजरी

पुण्यातील राजकारणाची ही नवीन नांदी ठरणार का हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.

pune mp girish bapat former rajya sabha mp sanjay kakade

पुणे : होळी, धुळवड च्या सणानिमित्त संपूर्ण देश रंगात रंगत असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्य सभेचे माजी खासदार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी एकमेकांना रंग लावत रंगांची उधळण करीत होळी आणि धुळवड साजरी केली. त्यामुळे आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील का, याबाबतची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा >>> पुणे : मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत राज्यव्यापी अनुसूचित जाती घटनात्मक हक्क संघर्ष समितीची स्थापना

होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांच्यासोबत रंग खेळून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी माजी खासदार संजय काकडे यांनी प्रार्थना केली तर, खासदार गिरीश बापट यांनी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. बापट आणि काकडे या आजी माजी खासदारांनी एकमेकांना लावलेले रंग येणाऱ्या भविष्यात नव्याने राजकीय रंग भरतील काय अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील राजकारणाची ही नवीन नांदी ठरणार का हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 18:25 IST