पिंपरी- चिंचवड: स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कासावगतीने सुरू आहे. आज सकाळपासून अनेक वाहन महामार्गावर आल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, शनिवार आणि रविवार अशा सलग चार सुट्ट्या आल्याने पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. खंडाळा घाट आणि अमृतांजन पुलाजवळ वाहनांची गती मंदावली होती. वाहन कासावगतीने पुढे- पुढे जात होते. लाखो वाहन एकाच वेळी महामार्गावर आल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात देखील दाखल होत आहेत. महामार्गावर दिवसभर हीच परिस्थिती होती, तसेच रात्री उशिरापर्यंत अशी वाहनांची संख्या कमी कमी होईल जाईल असा अंदाज महामार्ग पोलिसांनी वर्तविला आहे.