पुणे : नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील अतिक्रमणांवर महापालिकेने बुधवारी कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. महापालिकेने केलेेल्या कारवाईत या रस्त्यावरील अनेक नामांकित हॉटेल्स तसेच दुकानांनी केलेेले अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने महापालिकेने काढून टाकले.

नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर अतिक्रमणे वाढल्याने त्याचा त्रास पादचाऱ्यांना होतो. अतिक्रमणाच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे पत्र पोलिसांनी महापालिकेला दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईसाठी बांधकाम विभागाचाही मदत घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, विभागाचे सहाय्यक आयुक्त सदानंद लिटके, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट, रणजित मुरकुटे, शाम अवघडे, धम्मानंद गायकवाड यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.