महापालिकेचा निर्णय 

पुणे : टाळेबंदीच्या नियमांतील शिथिलतेनंतर शहरात सुरू करण्यात आलेली महापालिके च्या उद्यानांना पुन्हा टाळे लावण्यात आले आहे. उद्यानांचा वापर के वळ फिरण्यासाठी होत नसल्याचे आणि नागरिकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे उद्याने बंद करण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली ३३ उद्याने बंद करण्यात आली आहेत.

राज्य शासनाने टाळेबंदीच्या नियामांमध्ये शिथिलता आणताना तीन टप्प्यात सवलती जाहीर के ल्या होत्या. त्यानुसार के वळ फिरण्यासाठी, चालण्यासाठी उद्यानांचा वापर करण्यास मुभा देण्यात आली होती. राज्य शासनाच्या आदेशानंतर महापालिके नेही उद्याने सुरू करण्याचे आदेश दिले. महापालिके ची शहरात २०१ लहान-मोठी उद्याने आहेत. या उद्यानांपैकी मध्यवर्ती भागातील ३३ उद्याने पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली. करोना प्रतिबंधित क्षेत्रातील आणि या क्षेत्रालगतची उद्याने बंदच ठेवण्यात आली होती.

उद्याने खुली करताना राज्य शासनाच्या आदेशानुसार काही नियम निश्चित करण्यात आले होते. दहा वर्षांच्या आतील मुले, साठ वर्षांवरील नागरिक यांना उद्यानात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. उद्यानातील हिरवळीचा वापर करता येणार नाही, उद्यानातील व्यायाम साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच उद्यानात येताना सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करणे आणि मुखपट्टय़ांचा वापर करणे अपेक्षित होते. मात्र ही काळजी नागरिकांकडून घेतली जात नसल्याचे सातत्याने उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

उद्यान विभागातील रखवालदारांनी त्याबाबत हटकल्यास नागरिकांकडून वाद घालण्याचे प्रकारही सातत्याने पुढे येत होते. उद्यानात योग्य ती काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी सजग नागरिकांनीही के ल्या होत्या. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही उद्याने बंद करण्यात यावी, असे पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले होते. त्यानंतर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी उद्याने बंद ठेवण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले आणि ही उद्याने पुन्हा बंद करण्यात आली. आयुक्तांच्या आदेशानंतर उद्याने नागरिकांसाठी खुली के ली जातील, असे उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी सांगितले.