फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शालेय विद्यार्थ्यांच्या हातून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पुणे महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. पुणे महापालिकेत प्रत्येकी ४ सदस्यांचे एकूण ३९ प्रभाग आणि प्रत्येकी ३ सदस्यांचे २ प्रभाग असे एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. या सर्व प्रभागांमधून एकूण १६२ नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे यापैकी ८१ या महिला नगरसेविका असतील. प्रत्येक प्रभागातील चार सदस्यांपैकी २ सदस्य महिला असणार आहेत.

चार सदस्यांच्या प्रभागातील जागांचे नामकरण १-अ, १-ब, १-क आणि १-ड असे करण्यात आले आहे. २०११ ची जनगणना लोकसंख्या निश्चित करण्यासाठी प्रमाणित धरण्यात आली आहे. आरक्षण निश्चित करताना प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेली पहिली जागा ही त्या त्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल. प्रभागाच्या चिठ्ठ्या एका पारदर्शक बॉक्समध्ये ठेवून शाळेतील मुलांच्या हातून काढण्यात आली.
प्रत्येक प्रभागातील त्या राखीव गटाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निश्चित करून तसे प्रभाग उतरत्या क्रमानुसार ठरवून त्यावर आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रवर्गांसाठी एकूण जागा

अनुसूचित जमाती – २
अनुसूचित जाती – २२
नागरिकांचा मागासवर्ग – ४४
खुला – ९४
एकूण जागा – १६२

अनुसूचित जातीच्या महिलासाठी आरक्षित प्रभाग क्रमांक (एकूण जागा ११)

७ अ, २८ अ, ३५ अ, ३६ अ, ३७ अ, २६ अ, ८ अ, २९ अ, १६ अ,१ अ,१८ अ

अनुसूचित जाती सर्वसाधारण (पुरुष) आरक्षित प्रभाग क्रमांक (एकूण जागा ११)

२ अ, ३ अ, ४ अ, ६ अ, १४ अ, १९ अ, २० अ, २१ अ, २४ अ, ३० अ, ४१ अ

अनुसूचित जमाती महिला (एकूण जागा १)

७ ब

अनुसूचित जमाती सर्वसाधारण (पुरुष) (एकूण जागा १)

१ ब

नागरिकांचा मागासवर्ग महिला (एकूण जागा २२)

३९ ब, १५ ब, २३ ब, १ क, २ ब, ३ ब, ४ ब, ६ ब, १४ ब, १९ ब, २० ब, २१ ब, २४ ब, ३० ब, ४१ ब, १८ ब, ३७ ब, ५ अ, ८ ब, १७ अ, ९ अ, १२ अ

नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण (पुरुष) (एकूण जागा २२)

७ क, १० अ, ११ अ, १३ अ, १५ अ, १६ ब, २२ अ, २३ अ, २५ अ, २६ ब, २७ अ, २८ ब, २९ ब, ३१ अ, ३२ अ, ३३ अ, ३४ अ, ३५ ब, ३६ ब, ३८ अ, ३९ अ, ४० अ

सर्वसाधारण (खुला) महिला (एकूण जागा ४७)

२ क, ३ क, ४ क, ५ ब, ६ क, ९ ब, १० ब, १० क, ११ ब, ११ क, १२ ब, १३ ब, १३ क, १४ क, १५ क, १६ क, १७ ब, १९ क, २० क, २१ क, २२ ब, २२ क, २३ क, २५ ब, २५ क, २६ क, २७ ब, २७ क, २८ क, २९ क, ३० क, ३१ ब, ३१ क, ३२ ब, ३२ क, ३३ ब, ३३ क, ३४ ब, ३४ क, ३५ क, ३६ क, ३८ ब, ३८ क, ३९ क, ४० ब, ४० क, ४१ क

सर्वसाधारण (खुला) (एकूण जागा ४७)

१ ड, २ ड, ३ ड, ४ ड, ५ क, ५ ड, ६ ड, ७ ड, ८ क, ८ ड, ९ क, ९ ड, १० ड, ११ ड, १२ क, १२ ड, १३ ड, १४ ड, १५ ड, १६ ड, १७ क, १७ ड, १८ क, १८ ड, १९ ड, २० ड, २१ ड, २२ ड, २३ ड, २४ क, २५ ड, २६ ड, २७ ड, २८ ड, २९ ड, ३० ड, ३१ ड, ३२ ड, ३३ ड, ३४ ड, ३५ ड, ३६ ड, ३७ क, ३८ ड, ३९ ड, ४० ड, ४१ ड

पुण्यातील एकूण ४१ प्रभागांची यादी

१ कळस – धानोरी
२ फुलेनगर -नागपूर चाळ
३ विमाननगर – सोमनाथनगर
४ खराडी – चंदननगर
५ वडगावशेरी – कल्याणीनगर
६ येरवडा
पुणे विद्यापीठ – वाकडेवाडी
८ औंध – बोपोडी
९ बाणेर – बालेवाडी- पाषाण
१० बावधन –कोथरूड डेपो
११ रामबाग कॉलनी –शिवतीर्थ नगर
१२ मयूर कॉलनी – डहाणूकर कॉलनी
१३ एरंडवणा – हॅपी कॉलनी
१४ डेक्कन जिमखाना – मॉडेल कॉलनी
१५ शनिवार पेठ – सदाशिव पेठ
१६ कसबा पेठ – सोमवार पेठ
१७ रास्ता पेठ – रविवार पेठ
१८ खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ
१९ लोहियानगर – कासेवाडी
२० ताडीवाला रोड – ससून हॉस्पिटल
२१ कोरेगाव पार्क – घोरपडी
२२ मुंढवा – मगरपट्टा सिटी
२३ हडपसर गावठाण – सातववाडी
२४ रामटेकडी- सय्यदनगर
२५ वानवडी
२६ महमदवाडी – कौसर बाग
२७ कोंढवा खुर्द – मिठानगर
२८ सॅलीसबरी पार्क – महर्षी नगर
२९ नवी पेठ  – पर्वती
३० जनता वसाहत – दत्तवाडी
३१ कर्वेनगर
३२ वारजे माळवाडी
३३ वडगाव धायरी- सन सिटी
३४ वडगाव बुद्रुक – हिंगणे खुर्द
३५ सहकार नगर – पद्मावती
३६ मार्केटयार्ड – लोअर इंदिरा नगर
३७ अप्पर सुपर इंदिरा नगर
३८ राजीव गांधी उद्यान – बालाजीनगर
३९ धनकवडी – आंबेगाव पठार
४० आंबेगाव दत्तनगर – कात्रज गावठाण
४१ कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी