पुणे : बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. त्यामुळे आता नवीन शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोलिसांनी मानकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर नैतिकतेचा मुद्दा पुढे करून आपल्यामुळे पक्षाची बदनामी नको, असे स्पष्टीकरण देऊन राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण मानकर यांनी दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देणार, याबाबत तर्क-वितर्क लावले जात असून, पुढील चार दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.