पुणे : तुमची नाकाला जीभ लागते का? तर याचे उत्तर नाही असेच असते. पण, तब्बल ९० मिनिटे नाकाला जीभ लावण्याचा विक्रम पुण्याच्या कसबा पेठेतील सोपान भूमकर यांनी केला आहे.
हेही वाचा – पुणे : ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार युवतीचा मृत्यू, जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील अपघात
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी आपल्याकडे म्हण आहे. जीभ नाकाला लागतेच असे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. पण, पुण्यातील कसबा पेठ येथील शिंपी आळीमध्ये वास्तव्यास असलेले ज्येष्ठ नागरिक सोपान नारायण भूमकर यांनी तब्बल ९० मिनिटे म्हणजे, दीड तास नाकाला जीभ लावण्याचा विक्रम केला आहे. मुख्य म्हणजे पंचाहत्तर वर्षांचे भूमकर परिसरात काका या नावाने प्रसिद्ध आहेत. भूमकर काका यांनी ९० मिनिटे नाकाला जीभ लावल्याचा व्हिडिओ त्यांचे पुत्र हर्षल भूमकर यांनी चित्रित केला आहे.