पिंपरी-चिंचवड शहरात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील आकुर्डी परिसरात दहा जणांच्या टोळीने २० वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे, लाकडी दांडके आणि विटा होत्या. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, त्यांनी एका जणाला लुटले असून त्याच्याकडून कोयत्याचा धाक दाखवून काही रक्कम घेऊन पोबारा केला असल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करत असून रुपेश श्रीराम काळभोर यांनी फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीडच्या सुमारास दहा जणांनी आकुर्डीच्या विठ्ठलवाडी परिसरातील जाधव पार्क समोरील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या कोयते, लाकडी दांडके, विटांच्या साहाय्याने २० गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान, यात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

फिर्यादी रुपेश यांची नवी गाडी या टोळीने फोडली. तसेच रुपेश यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून काही रक्कम लुटली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे आणि कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून काही लवकरच संबंधितांना अटक करू, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pimpri chinchwad 10 people 20 car glass broken complaint file police investigation jud
First published on: 24-08-2019 at 15:31 IST