scorecardresearch

“अजित पवार पुण्यात कमी पडू लागले आहेत, त्यांच्याकडून सूत्र काढून घेणार असं वाटतंय”

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचं विधान.

“अजित पवार पुण्यात कमी पडू लागले आहेत, त्यांच्याकडून सूत्र काढून घेणार असं वाटतंय”
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील महापालिका निवडणूक आता जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेळावे घेत आहेत. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार कमी पडताय, म्हणून अजित पवारांकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडची सूत्र काढून घेण्याचा शरद पवारांचा प्रयत्न दिसतोय, त्यामुळेच ते आता इथे लक्ष घालताना दिसत आहेत, असं ते म्हणाले आहेत.

“ शाहरूख खानच्या मुलाचा यांना एवढा पुळका का? ” ; चंद्रकांत पाटलांचा महाविकासआघाडीवर निशाणा!

“बहुतेक अजित पवारांकडून सगळी सूत्र काढून घेण्याचा टप्प्याटप्प्याने प्रयत्न चाललेला दिसतोय. कारण, पिंपरी-चिंचवड, पुणे या महापालिकांमध्ये अजित पवार लक्ष घालत असताना, ते बहुदा कमी पडताय म्हणूवन शरद पवारांना इथे लक्ष घालाव लागतय. म्हणजे आम्ही केवढे मजबूत आहोत की एक अजित पवार पुरेसा होत नाही, म्हणून त्यांच्या मदतीला शरद पवारांना यावं लागतंय.” असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

शरद पवारांवर महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष देण्याची वेळ –

या अगोदर माध्यमांशा बोलताना “आमचे आमदार, नगरसेवक कसे नीट राहतील यासाठी आम्ही समर्थ आहोत. शरद पवारांवर महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष देण्याची वेळ आली. अजित पवार, अमोल कोल्हे हे लक्ष घालत आहेत याचा अर्थ असा की आम्हाला हरवणं सोपं नाही. ” असंही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलेलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2021 at 17:12 IST

संबंधित बातम्या