पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने आंबेगाव पठार व धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामामुळे येत्या गुरुवारी (२६ जून) या परिसरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२७ जूनला) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग : निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार सर्व्हे नं. १५ ते ३०, धनकवडी सर्व्हे नंबर २८,२९,३०,३४ ते ३७, चैतन्यनगर, अक्षयनगर, राजमुद्रा सोसायटी, रक्षा सोसायटी, विद्यानगरी, मोहननगर, तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.