नाना पेठेत कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या पाच जणांना समर्थ पोलिसांनी गजाआड केले. गगनदीपसिंग अमरीकसिंग मिशन (वय १९), अमन युसुफ खान (वय २२, दोघे रा. नाना पेठ), अरसलन हनीफ तांबोळी (वय २७), मंगेश कैलास चव्हाण (वय २४), गणेश प्रकाश पवार (वय २७, तिघे रा. रविवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : मध्यरात्री ध्वनिवर्धक लावून टोळक्याचा गोंधळ; कारवाई करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की; पाच जण अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पेठेतील नवा वाडा परिसरातील काही जणांशी आरोपींचा वाद झाला होता. त्यानंतर दुचाकीस्वार आरोपी मिशन, खान, तांबोळी, चव्हाण, पवार आणि साथीदार नवा वाडा परिसरात आले. त्यांनी कोयते उगारुन दहशत माजविली तसेच नागरिकांना शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या बरोबर असलेल्य साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक सौरभ माने, हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर आदींनी ही कारवाई केली.