पुणे : अमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलीस आयु्क्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटीज कंपनीवर छापा टाकून ११०० कोटी रुपयांचे किंमतीचे ६०० किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. मेफेड्रोन निर्मिती, तसेच विक्री प्रकरणाचे धागेदोरे देशभरात पसरल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया यांना सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. शेखने विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात मेफेड्रोन लपविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. विश्रांतवाडीतील गोदामातून ५५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा
bengaluru woman online fraud case
महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!
ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार
The Shapoorji Palanji Group on Tuesday announced the sale of Gopalpur Port in Odisha to Adani Ports and SEZ for Rs 3350 crore
अदानीं’च्या बंदर-सत्तेचा विस्तार; एसपी समूहाकडून गोपाळपूर बंदराची ३,३५० कोटींना खरेदी

हेही वाचा…पिंपरी : महापालिकेचा ८ हजार ६७६ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर; करवाढ, दरवाढ आहे का? वाचा सविस्तर…

आरोपी माने, शेख, करोसिया यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटीज कंपनीतून मेफेड्रोन तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत छापा टाकून ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो मेफेड्रोन जप्त केले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे उपस्थित होते.