नाताळ आणि नववर्षानिमित्त राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील मद्यालये (रेस्टो-बार) पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. तर, वाइन, बिअर आणि देशी मद्या विक्री दुकाने रात्री साडेदहाऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. नाताळ आणि नववर्ष स्वागतानिमित्त पुण्यात बनावट मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची खास २४ पथके तैनात असणार आहेत.

हेही वाचा >>> पुणे: समान पाणीपुरवठा योजना वर्षभरात पूर्णत्वाला जाणार का? सप्टेंबर २०२३ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी मद्यालये पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील मद्यालये पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. तसेच वाइन, बिअर आणि देशी मद्यविक्री दुकाने रात्री साडेदहाऐवजी रात्री एक वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. याबाबत बोलताना राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत म्हणाले, ‘राज्य शासनाच्या निर्णयाची पुण्यातही अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, या काळात पुण्यात बनावट मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन होऊ नये, म्हणून विभागाची नेहमीची १४ आणि खास दहा अशी एकूण २४ पथके कार्यरत असणार आहेत. या पथकांत प्रत्येकी दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांवर दोन उपअधीक्षक लक्ष ठेवणार असून या दोन उपअधीक्षकांकडून अधीक्षकांना वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे.’