पिंपरी : शहरातील नादुरुस्त, वापरात नसलेल्या, मोडकळीस आलेल्या सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार वापरात नसलेली शौचालये पाडण्यात येणार आहेत. त्या जागी नवीन शौचालयाची उभारणी किंवा इतर कारणांसाठी जागेचा वापर केला जाणार आहे.

महापालिकेने शहरातील विविध भागांत सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत शौचालयाची नोंद करण्यात आली आहे. नादुरुस्त आणि वापरात नसलेली शौचालये पाडण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी आरोग्य विभागास दिले होते. स्वच्छ सर्वेक्षणात सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची पाहणी करून गुण दिले जातात. त्यामुळे वापरात नसलेली, दुरवस्था, मोडकळीस आलेली शौचालये पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. काही ठिकाणी नव्याने शौचालय बांधण्यात येणार आहे. तर, काही ठिकाणी आरोग्य कार्यालय, आरोग्य कोठी, जिजाऊ क्लिनिक, भाजी मंडईचा विस्तार, वाहनतळ आदींची उभारणी केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार म्हणाले, ‘शहरातील नादुरुस्त, वापरात नसलेल्या, मोडकळीस आलेल्या सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार त्यातील काही शौचालये पाडण्यात येणार आहेत. तिथे नवीन शौचालयाची उभारणी किंवा इतर कारणांसाठी जागेचा वापर केला जाणार आहे.’