सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा तीन लाख चार हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून चोरट्याचा शोध सुरू आहे.

याबाबत विश्वजीत कांबळे (वय ३०, रा. इंद्रायणी सोसायटी, साडेसतरानळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : ‘पीएमपी’ प्रवाशाची ६० हजारांची सोनसाखळी लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांबळे कुटुंबीय सदनिका बंद करुन सकाळी अकराच्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्याने सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडला. शयनगृहातील कपाट उचकटून कपाटातील दोन लाख ८४ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच २० हजारांची रोकड असा ऐवज लांबवून चोरटा पसार झाला. काही वेळानंतर कांबळे घरी परतले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. कपाट उचकटून ऐवज लांबविल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर तपास करत आहेत.