पुणे : हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी खास करुन शासकीय कार्यालयाबाहेर विना हेल्मेट दुचाकी चालकावर वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालया जवळील मध्यवर्ती इमारतीच्या बाहेर विना हेल्मेट दुचाकी चालकांवर पोलिसांनी आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

हेही वाचा… पिंपरी : उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आणि चार दिवसांत नोकरी… एका महिलेने ‘असा’ केला संघर्ष

हेही वाचा… ‘पीएमआरडीए’चा रिंगरोड आता ‘मार्गावर’; पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहो साहेब या इमारतीमधील पार्किंगमध्ये गाडीवर हेल्मेट ठेवले होते, ते चोरीला गेले आहे आणि आता महिनाअखेर असल्याने हेल्मेट घेण्यास तेवढे पैसे देखील नाही, आता पेमेंट झाले की हेल्मेट घेणार आहे, मी नेहमी गाडी चालविताना हेल्मेट घालते पण आज घरातून निघण्यास उशीर झाला, त्यामुळे हेल्मेट घ्यायचे विसरली, अहो साहेब माझी मान दुखते म्हणून हेल्मेट घालत नाही….अशी अनेक भन्नाट उत्तर शासकीय कर्मचार्‍यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांना दिल्याचे पहायला मिळत आहे.