पुणे: मुंबईत १९ जून २०२५ रोजी ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा ५९ वा शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याचे पाहण्यास मिळाले.त्यानंतर पुण्यात शिंदे गटाकडून फ्लेक्स बाजीच्या माध्यमांतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.त्याच फ्लेक्सबाजीला ठाकरे गटाकडून देखील फ्लेक्सबाजी मधूनच प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये कुबडी तर दुसर्‍या हातामध्ये काँग्रेसचा ऑक्सिजन सिलेंडर, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी काल केलेल्या फ्लेक्सबाजी बाबत सांगायचे झाल्यास,ते बोलण्यात व्यस्त आहेत,आम्ही कामात मग्न आहोत….आशा आशयाचा मजकूर आणि त्याच्या खाली उध्दव ठाकरे यांच् व्यंगचित्र रेखाटण्यात आल आहे.उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये कुबडी तर दुसर्‍या हातामध्ये काँग्रेसचा ऑक्सिजन सिलेंडर, त्यावर कॉग्रेस पक्षाचे चिन्ह दाखविण्यात आले आहे.तसेच त्याच्या वरील बाजूला come on…kill me,आशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. तर त्याचाच बाजूला एकनाथ शिंदे हे खांद्यावर शिवसेनेचे चिन्ह असलेला भगवी पताका हाती घेऊन चालताना दाखविण्यात आले आहे. तर त्याचाच बाजूला एकनाथ शिंदे हे रुग्णालयातील जखमीशी संवाद साधताना फोटो दाखविण्यात आले आहे. तर या एकूणच फ्लेक्स बाजीची पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.

निष्ठेचे सोडून विचार, सत्तेसाठी एक… लाचार, ठाकरे गटाकडून फ्लेक्सबाजी

शिंदे गटाच्या फ्लेक्स बाजीला ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे,विभाग प्रमुख सुरज लोखंडे आणि प्रसिद्धी प्रमुख अनंत घरात यांनी प्रत्युत्तर दिल्याचे पाहण्यास मिळत आहे.निष्ठेचे सोडून विचार, सत्तेसाठी एक… लाचार,एकनाथ शिंदे यांनी मा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात उपभोगलेली पदे, विरोधी पक्षनेता, नगरविकास मंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री असा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आलेला आहे.तर या फ्लेक्सवर ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाया एकनाथ शिंदे हे पाया पडताना दाखविले आहे.तर दुसर्‍या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर पाय देऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची च्या दिशेने जाताना व्यंगचित्र साकारले आहे.तसेच झुकेगा मै… असा मजकूर देखील लिहिण्यात आला आहे.

कम ऑन किल मी : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे

नाना पाटेकर एका चित्रपटात गुंडा समोर उभे राहून म्हणतात,कम ऑन किल मी,त्या प्रमाणे मी ही गद्दारासमोर उभे राहून म्हणतो,कम ऑन किल मी,असेल हिंमत तर या अंगावर,पण अंगावर येणार असाल तर येताना रुग्णवाहिका घेऊन या,कारण सरळ यायला पण जाताना आडवे होऊन जाल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिनाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदारांनी तुमचा मुडदा पडला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले होते,मी डॉक्टर नाही पण छोटे मोठे ऑपरेशन करतो, पण मरे हूए को क्या मारणा असे म्हणत, मतदारांनी तुमचा मुडदा पडला आहे,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता.