पिंपरी- चिंचवड: चिंचवडमध्ये वॉचमनवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यात वॉचमन सुदाम नारायण कामीठे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी राम देवराम लोंढेला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. जीवघेण्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सुदाम कामीठे हा शांतीबन सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून वॉचमन आहे. तिथेच काही महिन्यांपूर्वी राम देवराम लोंढे हा देखील हाऊसकीपिंगचं काम करत होता. त्याने काम सोडून इतर ठिकाणी काम करत होता. परंतु, शांतीबन सोसायटीत कार वॉशिंगसाठी यायचा. हेच जखमी सुदामला खटकत होतं. यावरून त्यांच्यात अनेकदा किरकोळ वादही झाले. सुदाम हा देवरामला सोसायटीत येऊ देत नव्हता.
सुदाम हा देवरामला इथे काम करू नकोस असं नेहमी म्हणायचा. याचा देवराम लोंढेला खूप राग यायचा. याच रागातून देवराम लोंढेने शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास वॉचमन सुदामशी आधी बोलण्याचं नाटक केलं. मग, चाकू काढून थेट त्याच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात सुदामच्या पोटावर वार करण्यात आले.
पिंपरी- चिंचवड: चिंचवडमध्ये वॉचमनवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यात वॉचमन सुदाम नारायण कामीठे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी राम देवराम लोंढेला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. (व्हिडीओ क्रेडिट – लोकसत्ता टीम)https://t.co/2jrmCKw8Ui… pic.twitter.com/P11QSFwtOf
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) June 21, 2025
प्रतिकार केल्यानंतर सुदामच्या डोक्यात देवरामने सिमेंटची वीट मारली. यानंतर मात्र सुदाम जागीच कोसळला. घटनेनंतर फरार झालेल्या राम लोंढेला चिंचवड पोलिसांनी थेरगाव परिसरातील अटक केली आहे. सुदाम कामीठेची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.