सिगारेट ओढ नाहीतर तुला ठार मारेन अशी धमकी रुममेटने दिल्याने आणि त्याच्या सततच्या सिगारेट ओढण्याच्या आग्रहाला कंटाळून पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. पुण्यातील कर्वे नगर भागातल्या गुरुदत्त कॉलनीत ही घटना घडली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे ही घटना समोर आली आहे. या तरुणाने १० ते १३ ऑक्टोबरच्या दरम्यान आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  सागर अशोक पवार असं आत्महत्या केलेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. हा तरुण गुरुदत्त कॉलनी कर्वेनगर पुणे येथील बॉईज हॉस्टेलमध्ये रहात होता. तो मूळचा जळगावचा आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी पोलिसानी लक्ष्मण वासुदेव पाटील (वय ३०, गुरुदत्त कॉलनी) याला पोलिसानी अटक केली आहे. दीपक पवार यांनी यासंदर्भातली फिर्याद वारजे पोलीस ठाण्यात केली होती. सागर पवारने त्याचे बारावीचे वर्ष नुकतेच पूर्ण केले होते. तो अनाथ असल्याने आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. शिक्षणानंतर मार्केटिंग क्षेत्रातील एका खासगी कंपनीत सागर कामालाही लागला होता. तीन दिवसांपूर्वी तो कर्वे नगर येथील गुरुदत्त कॉलनीत राहण्यास आला होता. लक्ष्मण पाटील हा त्याचा रुममेट होता. लक्ष्मणने सागरला खोलीत आल्या दिवसापासून सिगारेट ओढण्याची सक्ती करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने सागरच्या मागे तगादाच लावला. खरंतर सागरने लक्ष्मणला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला होता. मात्र लक्ष्मण ऐकतच नव्हता तू सिगारेट ओढ नाहीतर तुला ठार करेन अशी धमकीही लक्ष्मणने सागरला दिली. या सगळ्याचा ताण असह्य झाल्याने सागरने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune youth commits suicide after his roomate forced him for cigarette smoking scj 81 svk
First published on: 15-10-2020 at 16:02 IST