scorecardresearch

‘भारती’ची ‘उळागड्डी’ ठरली पुरुषोत्तम करंडकाची मानकरी

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या ‘उळागड्डी’ या एकांकिकेने सवरेत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेबद्दलच्या जयराम हर्डीकर करंडकासह पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले.

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या ‘उळागड्डी’ या एकांकिकेने सवरेत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेबद्दलच्या जयराम हर्डीकर करंडकासह पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. स.प महाविद्यालयाच्या ‘बेल’ या एकांकिकेने हरी विनायक करंडकासह सांघिक द्वितीय तर, एमआयटी महाविद्यालयाची ‘क ला काना का’ या एकांकिकेने संजीव करंडकासह तृतीय क्रमांक पटकावला.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी रात्री संपली. यावर्षी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स महाविद्यालयाने वैयक्तिक पारितोषिकांवरही आपली मोहोर उठवली आहे. या फेरीसाठी प्रसिद्ध अभिनेता किशोर कदम, दिग्दर्शक राकेश सारंग आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी परीक्षणाचे काम पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता, नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १२ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत झाली. या स्पर्धेत ५१ संघांनी आपल्या एकांकिका सादर केल्या.

वैयक्तिक पारितोषिके
सवरेत्कृष्ट अभिनय – (केशवराव दाते)- तन्वी कुलकर्णी, गरवारे वाणिज्य
वाचिक अभिनय – (पुरुषोत्तम जोशी) – क्षितिज दाते, स. प. महाविद्यालय
अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) – (गिरिजा माधव)- चैताली बक्षी, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स
अभिनय नैपुण्य (अभिनेता) – (निर्मल) – शिवराज वायचळ, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स
दिग्दर्शन – (चिंतामणराव कोल्हटकर) –  शिवराज वायचळ, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स
आयोजित संघ – (भागिरथ करंडक) – पीआयसीटी
विद्यार्थी लेखक – मानस लयाळ, गरवारे वाणिज्य
प्रायोगिक विद्यार्थी लेखक –  शिवराज वायचळ, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स
दिग्दर्शन उत्तेजनार्थ – क्षितिज दाते, स. प. महाविद्यालय, अजिंक्य गोखले, गरवारे वाणिज्य

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2013 at 02:46 IST

संबंधित बातम्या