पुणे : शहरातील बेकायदा हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने छापे टाकले. बंडगार्डन रस्त्यावरील राजा बहाद्दुर मिल परिसर तसेच कोरेगाव पार्क भागातील दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. हुक्का पार्लर चालविणाऱ्या हाॅटेल मालकांसह व्यवस्थापकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

शहरातील अवैध धंद्यांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. आदेश धुडकावून शहरातील काही हाॅटेल चालक बेकायदा हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवाई केली. कोरेगाव पार्क भागातील गेरा लिजंट या इमारतीत राॅक वाॅटर नावाच्या हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Bank dispute in private building is in police case filed against Canara Bank management
खाजगी इमारतीतील बँकेचे भांडण पोलिसात, कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा >>> कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांसाठी १७२० ईव्हीएम दाखल

या कारवाईत हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हाॅटेल व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अजय राणे, अण्णा माने, मनीषा पुकाळे, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा >>> पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल

बंडगार्डन रस्त्यावरील राजा बहाद्दुर मिलच्या आवारात हाॅटेल ‘ड्रामा ९’ या हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हाॅटेल मालकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, प्रवीण उत्तेकर, संदीप शिर्के, मारुती पारधी, सुजित वाडेकर आदींनी ही कारवाई केली.