वर्षाविहारासाठी आलेला एक युवकाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना लोणावळ्यातील नागफणी पाँईंटवर घडली. रोहन महाजन असे मृत युवकाचे नाव असून तो रेल्वे विभागात अभियंता पदावर कार्यरत होता, असे समजते. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. उशिरापर्यंत लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाकडून रोहनचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणावळा येथे रोहन महाजन (वय ३०, रा. पडगा, ता. भिवंडी, जि. ठाणे) हा आपल्या मित्रांसह वर्षाविहारासाठी आला होता. नागफणी पाँईंट येथे रोहनचा तोल गेला आणि तो थेट खोल दरीत पडला. याबाबत माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शिवदुर्ग पथकाकडून रोहनचा शोध घेण्यात आला. पण त्यांना रोहनचा मृतदेह आढळून आला.  पाऊस आणि धुक्यामुळे सुरूवातीला शोध कार्यात अडचण आली. शिवदुर्गच्या पथकात रोहित वर्तक, समीर जोशी, ओंकार पडवळ, प्रणय आंबुरे, योगेश आंबुरे, प्रवीण ढोकळे, सनी कडू, अभिजित बोरकर, राजू पाटील, अशोक उंबरे, गणेश गायकवाड, दिनेश पवार, निकीत तेलंगे, तुषार केंडे, प्रवीण देशमुख, अजय शेलार, दिनेश पवार, राजेंद्र कडू, आनंद गावडे व सुनील गायकवाड यांचा समावेश होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway engineer collapsed in the lonavala valley
First published on: 19-08-2018 at 19:58 IST