महत्त्वाच्या कामासाठी पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रविवारी (२२ मे) गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यासाठी आणि अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे पुण्यामध्ये आले होते. मंगळवारी रात्री अक्षरधारा बुक गॅलरी येथून त्यांनी पुस्तकांची खरेदी केली होती. मात्र, अचानक ठाकरे यांना पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतावे लागले होते. त्यानंतर ही सभा होईल की नाही या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र,आता ही सभा रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, याआधी याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी, राज ठाकरेंची सभा पुढील आठवडभरात होणार असल्याचं स्पष्ट केले होते. राज ठाकरे उद्या सकाळी अकराच्या सुमारास सभेचं ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचंही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं होतं की, राज ठाकरे यांच्या सभेसाठी डेक्कन येथील नदी पात्रातील जागा मिळावी, याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र हवामान विभागाने २३ तारखे पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नदीपात्रात मेट्रोचं काम देखील सुरू आहे. अशात जोरदार पाऊस आला तर सभेच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो.त्यामुळे आम्ही नदी पात्रातील ठिकाण रद्द केलं असून आम्हाला अन्य तीन ठिकाणांची परवानगी मिळाली आहे. त्या ठिकाणाबाबत राज ठाकरे उद्या स्वतः जाहीर करतील. या आठवड्याच्या शेवटी ही सभा होणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत सभा रद्द होणार नाही.”