शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनच्या सहकार्याने आयोजित शाहीर किसनराव हिंगे स्मरणार्थ किल्ले स्पर्धेत राजे ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रबोधिनीतर्फे गेली २० वर्षे ही किल्ले स्पर्धा आयोजित केली जात आहे. लाल महाल येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनचे अध्यक्ष किशोर आदमने यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, गणेश टोकेकर आणि राजेश राऊत या वेळी उपस्थित होते. दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत ५० संघांनी भाग घेतला होता. राजेंद्र बवरे यांनी घरोघरी जाऊन किल्ल्यांचे परीक्षण केले. रुपाली मावळे यांनी सूत्रसंचालन केले. होनराज मावळे यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : द्वितीय- ओंकार जावळकर, तृतीय- बालराजे ग्रुप, छोटा किल्ला स्पर्धा : प्रथम – प्रथमेश गुंड, द्वितीय- नंदकुमार मित्र मंडळ, तृतीय- चैतन्य गायकवाड.